स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Sunday, 23 October 2011

पहाट

वेळ जरी खूप झाला
डिसेंबर हि संपून गेला
तरी त्या वळणावरी
घेऊन आस प्रेमाची मनी
उभा आहे अजूण हि मी


क्षण क्षण सतावते आठवण तुझी
अखेर येशील तरी कधी
बघतोय वाट तुझी रस्त्याच्या काठी
रस्त्यावरती नजरा,
हतामध्ये गजरा
आणलाय तुझ्या साठी


येतांना करून ये तो गुलाबी पोशाख
त्यात दिसतेस तू खास
तू आल्याचा नेहमीच होतो भास
कारण तुझ्या प्रेमाची आस


ये लवकर संपतोय त्या लाल गुलाबांचा सुवास
कदाचित संपून ना जावो मझ्या प्रेमाचा श्वास


खडकाळ असली जरी वाट
काट्यांनी भरलेला असला जरी घाट
तू मला भेटण्या नक्की येशील
पाहिल मी तुझी वाट
एक दिवस येईल घेऊन ती पहाट

No comments: