स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Sunday, 23 October 2011

कुणी तरी असत

माझा नेहमीच पाठलाग करत कुणी
मझ्या संगेच असत कुणी प्रत्येक क्षणी
दिसत नसल तरी भासत मनोमनी
पण नक्कीच असत कुणी तरी


मी एकटाच असतो चालतांना
पण चाहूल जाणवते कुणाची तरी
सुन्या सुन्या त्या वाटेवरी
खरच असत कुणीतरी


त्या वाटेवर अचानक थांबतो मी
बघतो सगळ्या बाजूंनी
मोठ्याने म्हणतो आहे का कुणी
तेंव्हा बोलत कुणी मुक्या शब्दांनी
असच घडत पावलोपावली
अन जेव्हां वळून बघतो मी माघारी
तेंव्हा मझ्या पावूलखुणा माझ्याच असतात
पण त्या संगे पावूल खुणा असतात कुणाच्या तरी

No comments: