
प्रत्येक मुलगी साडी नेसून नटली होती
आणि तू ग माझी राणी
कल कुठे लपली होती
प्रत्येक चेहरा काल सजलेला
पावडर आणि लालीचा लेप प्रत्येक चेहऱ्याला
त्यांच्या गळ्यात मोत्यांच्या माळा
अन कानात डूल
काळ्याभोर केसांमध्ये मोगऱ्याची फुलं
हवेत उडणारे त्यांचे ते केस
जणू परीचा देश
त्याचं ते हसणं अधिकच खुलत होत गालावर
भुरळ घातली सखे त्यांनी मनावर
सुंदर अश्या त्या बाहुल्या
जश्या स्वर्गातल्या सावल्या
मनाच अस पाणी पाणी झाल
जेंव्हा एकीन वळून माझ्या कडे पाहिलं
पण इमानदारीन सांगतो
त्यात मी तुलाच शोधात होतो
मझ्यावर विश्वास ठेव
त्यांना बहिण म्हणून बघत होतो
No comments:
Post a Comment