स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Wednesday, 26 October 2011

गार गार वाऱ्यात

तीच घर म्हणजे घर एका गरीबाच
तिच्या घराचं छत आहे अनेक थिगळाच
पाऊस आला कि गळत ते सार
घरा सगट दार
साचत मग सगळी कडे पाणी
 पाण्यात बसून केविलवाणी
रडत रडत गाते गाणी
मग मात्र भलतीच चिडते
पावसाला हि शिव्या देते
मग काय मनात येत तिच्या
हळूच जाऊन खिडकी खोलते
पाऊसातले काही थेंब हातावर झेलते
मग तो लाल चेहरा झाकल्या जातो आनंदात
पाऊस हि झुलतो गारव्यात
मग बघून सारी हिरवळ हळूच घेते ती माझ नाव ओल्या घरात
असाच सगळ चालत पावसाच्या गार गार वाऱ्यात

No comments: