स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Tuesday, 25 October 2011

अभय विसरलास वाटत..!!!!!

ती आज किती दिवसांनी दिसली
पाहून थोडीसी हसली
मग जवळ येऊन बसली
आणि म्हणते कशी
अभय विसरलास वाटत..........................!!


तूच मला प्रपोझ केल होतस
माझ हि तुझ्यावर प्रेम होत
किती लाजले होते मी
जेंव्हा तू मला i love u म्हंटल होत
विसरलास वाटत..........................!!


ती संध्याकाळ
ते वडाच झाड
ते तुझ वाट पाहण्
माझ नेहमीच उशिरा येन
विसरलास वाटत..........................!!


माझ्या साठी तू ते गुलाबाची फुल घेऊन यायाच
मी म्हणायचे खर्च कश्याला उगाच
तू फक्त हसायचास
एवढंच म्हणायचास
फुल भेट दिल्याने प्रेम वाढत
विसरलास वाटत..........................!!


तू कॉलेग मध्ये माझ्या साठी भांडला होतास
तू समोरच्याला मारल खर
पण ज्यास्त मार तूच खाल्ला होतास
तुझ्या त्या जखमा माझ्या ओढणी ने मी पुसल्या होत्या
ती ओढणी आजून हि आहे आतल्या कपाटात
आठवण आली कि रडायला येत रे
खूप रडते मनात ल्या मनात
दुख पाचवतांना त्यांच्या साठी खुश रहाव लागत
माझ्यावर खूप करतात प्रेम ते हि
नशिबच शेवटी ते आपल्या हातात काय असत ????


कदाचित हि आपली शेवटची भेट
हि तु दिलेली सगळी गुलाबाची फुल
आणि हि तू दिलेली  दिवाळीभेट
आज सगळच संपल
वेवेगळ्या आहेत आता वाटा जीवनाच्या
खूप खुस राहा
या दिवाळीच्या खूप सुभेच्या




















No comments: