कधी रडतो
संध्याकाळी त्या वळणावर जाऊन बसतो
तिथेच तुझी वाट अजून हि बघत असतो
ते दिवस पुंन्हा आठवत असतो
मनातलं गुपित मनालाच सागत असतो
त्यावळणावर जनु जीवनच शोधात असतो
एका परीच्या आठवणीमध्ये
हा वेडा असाच झुरत असतो
संध्याकाळ संपवून सूर्य निघून जातो
जड पावलांनी मी पुंन्हा घराकडे वळतो
डोळ्यातील आसवांना अलगत पुसतो
तेंव्हा चांदण्यांसोबत चंद्र आकाशात आलेला असतो
मी मात्र नशिबालाच दोष देत असतो
एक दिवस येईल ती
स्वतःहाच स्वतःला सांगत असतोखरच याच आशेवर जगत असतो
No comments:
Post a Comment