स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Wednesday, 26 October 2011

चिता

हसणाऱ्या गालाची काय झाली दश्या
टपोऱ्या डोळ्यांच्या या विहिरी कश्या
मनाच्या बंधनाशी अस का केल
प्रितीच फुलपाखरू केंव्हाच वूडून गेल

काळजाचा आरसा केंव्हाच फुटला
आरोपीवर खटला भरला
सुटला आरोपी सत्य सांगून लाख
प्रेमाच्या चुलीत फक्त उरली राख

मनाची केंव्हाच पेटवली चिता
पेटलेल्या मनाची हि रडणारी गीता
रडणाऱ्या डोळ्यात बघा कधी
दिसेल तुंम्हाला प्रेमाची समाधी

पाहतोय मी आज चार खाद्यांची वाट
एक दिवस उठेल मृत्यूच्या समुद्रांत अग्नी ची लाट
मेलेल्या मनाची हि एक व्यथा
प्रेमावर प्रेम करणाऱ्या एका वेड्या फुलपाखराची कथा

No comments: