
त्यात पाऊस हि आला
सुटलेला गारगार वारा
पुन्हा दाखवत होता आठवणींच्या पाऊलखुणा
उलटली पुन्हा डायरीची पान
आठवल ते पावसाच येन
तीन वळवावी पावलं घच्या दिशेन
पटपट चालणाऱ्या पावलांना
आठवल वाटत घसरणं
पुन्हा उठलीच नाही चिखलातून घसरलेली पावलं
पण टपोऱ्या अश्या डोळ्यांना रडणं मात्र आठवलं
त्यात नियतीन फिरवावी चक्र वेगळ्याच दिशेनं
तितक्यात माझ ते येणं
नाजूक ओल्या हातांना अलगत उचलणं
ओल्या ओल्या पावसात छत्री मध्ये घेऊन तिला
मी माझ्या डोळ्यांनी पहिला
तिच्या डोळ्यातून पडणारा पावसाळा
रडता रडता रडतांना
विजेने केली गर्जना
घाबरून तिने धरल माझ्या बाहूंना
मी तर फक्त बघतच होतो
नियतीच्या डावांना
ती बाहुली पूर्ण होती भिजली
रडून रडून चेहऱ्यावती आली होती लाली
केसांमधून ओघळत होतं पाणी
असंच सगळ घडलं
जेंव्हा होतं फक्त पाणीच पाणी...!!!!
No comments:
Post a Comment