स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Wednesday, 14 October 2015

चसमीस



चसमीस तुझ्या नाकावर राग ग किती
रुसलीस  अशी जशी कि बोलणारच नाही कधी

म्हटलीच नाहीस मला साथ हवी रे तुझी
हात सोडताना सहज सोडलास
माझ्याशी भांडली का नाहीस?
आता रुसलीस अशी जशी कि बोलणारच नाही कधी


चसमीस प्रेम माझ
फक्त चार दिवसांचा नव्हता ग खेळ
प्रेम लपऊन दूर झालो
चुकीचा होता तो वेळ
सावरताना स्वतःला कितीदा मी तुटलो
पाऊसात भेटायचं ठरल होत म्हणून
तुझ नाव घेत कित्तेकदा एकटाच पाउसात भिजलो

घरदारचा विचार करत
वाटल तुला  खूप करावा  लागेल संघर्ष तुझ्या आपल्याशी
आठवत  त्या मुळेच तू त्या दिवशी रडली किती
तेंव्हाच ठरवलं थांबूया काही वेळासाठी
पण तू आता रुसलीस अशी कि जस तू बोलणारच नाही कधी .....

तुला आठवतंय आपन जेथे भेटलो होतो
तू घाबरत घाबरत आलीस खरी
पण बोलताना दुपारची
संध्याकाळ केंव्हा झाली कळलंच नाही
असच असत का ग प्रेम
जे समोर असत ते का नाही दिसत 
आणि आठवणीत तुझ्या गेल्याशिवाय नाही ना जमत

चसमीस आज हि मी थांबलोय तुझ्या साठी
तुझा एव्हाना उठला असेल विश्वास प्रेमावरून
पण मी थांबलोय तेच प्रेम घेऊन
आज हि विचार करतो तुला बोलायचा
पण  समजवायला
अपुरा आहे माझ्याकडे शब्दांचा साठा
तू ये यार लवकर आता आयुष्यात
नको हा लपंडाव आता
बघ पाऊसात भेटायचं ना आपल्याला
ये लवकर संपून न जावो हा हि पावसळा....!!! .

         




                                                 

No comments: