जेंव्हा मित्र माझा
अनोळखी माणसाण मध्ये
माझी ओळख करून देतो
नाव गाव सांगून होत
आणि कवी असल्याच अलगद बोलून जातो
तेंव्हा समोरच्याचा चेहरा मात्र बघण्या
सारखा होतो
जसा त्याला पकडून मी
आपल्या दोन तीन कविता चीपकवणारच असतो.
पण काहीना कवी म्हणजे
काही नवीनच प्रकार वाटतो
जरा गोंधलेल्या अवस्थेत
तो काही वेळ विचारच करत राहतो
तरी काही समझत नाही..उमजत नाही
काही वेळाने हसत हसत हा ..कवी कवी ना
अस म्हणत
सरकारी खात्यातल एखाद पद असाव असा समज
करून घेतो ..शांत होतो.
पण माझी पंचायीत तेंव्हा होते जेंव्हा त्यातला
एखादा मुलीचा बाप असतो
कवी एकूण कुठल खात आणि पगार पाण्याच
विचारून तो मोकळा होतो .
कवी म्हंटल्यावर त्यातल कुणी म्हणूनच
जात
हल्ली तसल्या कविता राहिल्याच नाही हो
आता सगळ्या कविता “नारी” वरती
प्रेमाच्या जगलात..अशीच सुरु आहे आजच्या
कवींची भटकंती.
तेवढ्यात दोन तीन ओळी ऐकवायची विनंती
होते
बघता बघता एखादी कविता होऊन जाते
खुश होऊन काही टाळ्या मिळतात
पण मुलीचा बाप मात्र ...लगेच काढता पाय
घेतो
तो समजून जातो
कवी अखेर प्रकार काय असतो ?
कवी अखेर प्रकार काय असतो ?
No comments:
Post a Comment