स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Tuesday, 25 October 2011

कसा येऊ सोडून मायेचा पिसारा

प्रेमा मध्ये शहीद होणे मला नाही जमणार
कारण आणि वडिलांना मी एकटाच आहे अधार
त्याचे उपकार आहेत अनंत
या शान भराच्या प्रेमाने करू कसा त्यांचा अंत

आपल्या प्रेमाला नाही ते म्हणाले
तू पळून जाण्याचे कोडे मांडले
आग वैरी या दुनियेत
त्यांनीच आनंदाचे मोती पाजले

तुझ्या पेश्या हि अधिक उपकार त्यांचे आहेत
जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांचीच साथ आहे
भाकरीचा प्रत्येक तुकडा त्यांनी माझ्या साठी राखून ठेवला
उपाशी दिवस कडून अग
घास मला भरवला

मी जर तुझ्या संगे पळून गेलो
तर हे दुनियावाले माझ्या आई वडिलांना खूप ग छळतील
त्यांच्या ह्र्दयाचे स्पंदने बंद पडतील
अश्रुंनी त्यांचे डोळे ग भरतील
मुला साठी खूप ग तडफडतील

मला हे नाही पहावणार
मुलगा असून हि ते वनवासी राहणार
अग देव हि मला शिव्या देईल
अस कृत्य माझाकडून होईल

प्रत्येक गोष्ट दिली जी मी मागितली
आजारी पडलो तेंव्हा रात्र उश्याशी बसून घालवली
शेत मध्ये ते राब राब राबले
अंन शाळा मला शिकवली

त्यांची स्वप्न अशीच असेल
म्हातारपणी मुलगा आपली काठी धरील
देईल एका कोपऱ्यात आसरा
तूच सांग कसा सोडून येऊ मायेचा पिसारा


No comments: