
एक फुल पाहून हसल मला
मी विचारल त्याला
हसतोस का असा
अन काय झाल हसायला
रडता आहेत डोळे
वैतागलेल्या जीवनाला
दूरच कोण असणार
जवळच्यानेच घात केला
ह्र्द्यात ठेवलं मनात जपल ज्या फुल पाखराला
उडून गेल ते
पाहून फुलामधल्या त्या मधाला
अश्रुंच पाणी वाहून खूप समजवलं
पण न थांबू शकलो, सुटलेल्या वाऱ्याला
शेवटी जोडले हात, आठवून देवून ती आन
हसू आलं त्या फुलपाखराला
अंन म्हणाल
तू खरच समजलास वाटतं त्या बहुला बाहुलीच्या खेळला
1 comment:
धन्यवाद
Post a Comment