स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Wednesday, 26 October 2011

तू सोडून जाता

ते दिवस आता कुठे
जेंव्हा फुले हि बोलायची
सूर्य हि हसायचा
चंदनी हि फुलायची
कळीला हि उमलायची घाई असायची
आणि तुझ्या केसांमध्ये लपायची

तुला बघण्यासाठी चंद्र आसुसलेला असायचा
आपण ज्या निबोणीच्या झाडाखाली भेटायचो
तेथेच पानात लपून बसायचा

तुझ्या केसांकडे बघता
दिवसा हि रात्र वाटायची
त्यात गुलाबाची काळी असायची

तू गेलीस पण मन माझ  त्याचझाडा खाली
तुझी वाट बघत बसल
तू जाताच चंद्रान उगवंनच सोडलं
तू सोडून गेल्याने मी इतका रडलो
कि एक मोट्ठ तळ तेथे बनलं

No comments: