स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Monday, 9 January 2012

ती..!!!

आज ती भेटली होती किती दिवसांनी
पक्की गृहिणी वाटत होती
ती भेभान हसणारी..बिनधास्त राहणारी
काय माहित कुठे हरवली ती ..

... समोर येताच छान सी थोडक्यात हसली
म्हणलो चाल तुझी आवडती कॉफी घेऊ
तर म्हणली ती "मी तर आता कॉफी केंव्हाची सोडली
कारण विचारल तर म्हणली
यांना एलर्गी आहे ना कॉफी च्या सुगंधाची

म्हणलो..काय आता तुझ्या कादाब्रीच्या छंदच काय झाल
खुपश्या कादंबऱ्या वाचल्या अशील ...
हसली पुन्ना एकदा...नाही आता वेळच नाही
घरातली काम...पुन्हा हे कडक आहेत फार
प्रत्येक गोष्ट यांना वेवेळेवर हवी
आणि एक मुलगी आहे छोटीसी...

मला हि हसू आल
ती... ती.. आणि तीच असच काल पर्यत होत ते सार
पण आज सखी माझी
अर्पण आहे इतरांसाठी

ठोक्यात बोलून म्हणली
चल भेटू पुन्हा असच अचानक कधी
लवकर जाव लागल घरी
नाही तर खूप बोलतील सासूबाई....!!!!!

चिंतातूर चेहऱ्यावर
थोडीसी smile आली
मनाला कुठे तरी रुतलं काही
ती अशी नव्हतीच कधी
वेळच अशी ती दुर्दैवी होती
तरी तेंव्हा ती...म्हणली होती
अभय वेळ शेवटची हि
उद्या मी असेल कुणाची तरी
आणि ती सरळ पुढे गेली
मी बघत राहिलो तिला पाठमोरी..!!!

No comments: