कधी कधी
असच होत
मी नसतो माझा
संपर्क तुटतो जेंव्हा
मना पासून मेंदूचा
मनात असत काही
विचार वेगळे
आणि ओठांवर येत वेगळच काही
विसरतो जग सार
चालत असतो एकटाच
जेंव्हा कोन्हीच नसत त्या वाटेवर
एकटाच बडबडतो
भान जेत जेंव्हा
थंडगार वारा अंगाला झोंबतो
मी नसतो माझा
संपर्क तुटतो जेंव्हा
मना पासून मेंदूचा
जुने क्षण येरझाऱ्या मारतात मनात
कधी हसतो मी..तर कधी कंठ दाटून येतो
मी माझ्याशीच खेळतो
जेंव्हा एकटाच असतो
का होत अस
विचार वादळा सारखे गुमात जातात
ये येईल रस्त्यात त्याला मातीमोल करत जातात
पण थाबत ते वादळ अचानक
जेंव्हा रस्ता संपतो.मी उभा असतो घराच्या दारात
पण का होत अस मनालाच विचारतो
मी नसतो माझा
संपर्क तुटतो जेंव्हा
मना पासून मेंदूचा
No comments:
Post a Comment