स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Tuesday, 17 January 2012

प्रेम.असच असत

प्रेम...कुणाला हि होऊ शकत
नही म्हणा तुम्ही लाख
पण जेंव्हा येईल अविष्यात कुणी खास
किती हि तुमचा असला आत्मविश्वास
तरी सगळच तिथे शून्य होत
समोर येत कुणी अचानक
आणि मनाच पाणीपत होत

तुम्ही आज जरी असाल ठाम
नाही...मी..नाही प्रेमात पडणार
असे खूप आले आणि खूप गेले
ऋषीमुनी हि वनवास सोडून
संसारात रमून गेले

प्रेम असच असत राव
पळाल तर धरत
धरल तर चावतं
डोळ्या मध्ये येत पाणी
आणि...हसावंस हि वाटत

काही म्हणा तुम्ही
खूप प्रेमळ असत प्रेमच गाव
कुणाव तरी खर प्रेम करा
बघा किती मस्त वाटत राव
पण शक्य तो टाळा चूक ती प्रेम करण्याची
पण जर चूक झालीच
अविष्यात तो किंव्हा ती आलीच
गर्वला करा परख
जपा त्या प्रेमळ नात्याला
तळ हाताच्या फोडा सारख

No comments: