स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Sunday, 26 February 2012

मी स्वार्थी होणार

विचार आला उगीच मनात
आता खुशीतच रहायचं
दुख आल जरी दाराशी
त्याला घरातच नाही घ्याच
देईल आवाज ते
दार हि ठोठावेल
घरात कुणीच नाही
सागेल त्याला... माघारी पाठवेल
आता खूप झाल
दुसऱ्यांचा विचार
खूप दा घेतली मी माघार
आता स्वार्थी होणार
खूप झाली हाजी हाजी
आता तलवार आहे हाती
कुणी आल जर मधी
एका घाव होतील दोन तुकडे
विसरलोय मी आता नाती.....!!!!

No comments: