स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Thursday, 18 October 2012

पुण्यातल्या PMTत


पुण्यातल्या PMTत
ती चक्क जवळ येऊन बसली
पावसात चिंब भिजलेली
ती सुंदरशी परी....!!!!

डोक्यावरच पाणी
चेहऱ्यावरती झिरपत होत
हातामधल्या इवल्याश्या रुमालानं
पाणी पुसता पुसता
केंव्हाच आत्मसमर्पण केल होत...

तरी हि तिच्या चेहऱ्यावर
पण SMILE का होती
माझ्या कडे बघत म्हणाली छान आहे न पाऊस किती...

SMILE माझ्या हि चेहऱ्यावर झळकली
बालपण्याच्या पाऊसाची आठवण झाली
मी हि असाच होतो जासी आज आहे ती.....

इतक्यात खिडकीतल पाणी
अंगावर आल
नव्या कोऱ्या कपड्यांचं वाटोळ झाल
बघतच ते छान सी हसली
म्हणाली "कपडे तर खराब होणारच किती हि जपले जरी
आता पाऊसात जावून
भिजा मस्त पैकी
एकच हसलो मी आणि ती....!!!

वेडी ती..
मला हि वेड लाऊन गेली
पण राव मनाला भिडून गेली.
ओल्या ओल्या पाऊसात ती मी आणि PMT.
.

No comments: