स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Sunday, 16 December 2012

ऑफीसचा एक कोपरा

ऑफीसचा एक कोपरा
जिथे असतो सुंदरसा
एक चेहरा हसरा,
पुन्हापुन्हा तेथेच का ?
वळतात माझ्या नजरा....!!!

तो चेहरा सुंदर रे असला
मनात बसला
प्रत्येक smile नंतर
क्षण हि ..क्षणभर थांबला...!!

रोज सकाळी जेंव्हा बघतो
मनात गोधळ उडतो
सावरतो न सावरतो स्वतःला
शेवटी विचार बुडतो
विचारातून हा तिढा अलगत सुटतो
मनातून अवाज येतो 
अभय मृगजळ हे कश्याला धावतो..!!!

मग नजरेला रोखतो
धाक हि दाखवतो
त्या दिशेला धोका आहे
नजरेला समजून हि सागतो
पण अप्पुन साला त्या धोक्यात पुन्हा पुन्हा का ?सापडतो..!!

थंड चहा पितांना
दोन तीन गाणे अर्धे अर्धे गातांना
पुन्हा office च्या  कामात गुंतून जातो..
office चा तो कोपरा रोज असाच आठवणीत राहून जातो
रोज असाच आठवणीत राहून जातो...!!!!

टीप : हि कविता पूर्णपणे काल्पनिक असून ईचा वास्तविक जीवनाशी
    कुठल्या हि प्रकारचा संबंध नाही आणि असल्यास तो मात्र
    एक योगायोग समजवा.

No comments: