स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Thursday, 17 January 2013

आज शद्ब मुके झाले

आज शद्ब मुके झाले
डोळ्यांना अश्रुंचे ओझे झाले
तू नाकारलस
याचे दुःख नाही मला
मीच मुर्ख
तुझ्या प्रेमाचे ओझे
गाढवा सारखे वाहिले..!!!

तू म्हंटली
ती माझी पूर्व दिशा
तुझ्या एका smile साठी
स्वतःचा पोपट कित्तेक दा केला
तू नाकारलस
याचे दुःख नाही मला....!!!

तुझ्या साठी ofice ला
कित्तेंदा दांड्या मारल्या
बॉस ने माझ्या सह घरच्यांच्या हि
आरत्या केल्या
तरी हि तू बोललीस
त्या दिवसी तुज्या समोर हजर असायचो
तुझी वाट बघत चातका सारखा
तू नाकारलस
याचे दुःख नाही मला....!!!

तुझा हक्काचा हा
मॉल मधला हमाल
तुझ्या मागे मागेच असायचा
कधी तू विचार केलास
माझ्या खिश्या मधल्या पैश्याचा
फक्त तू खुश असलीस ना
खूप खुशी व्हायची मनाला
तू नाकारलस
याचे दुःख नाही मला....!!!

असो...तुला प्रत्येक खुशी मिलो
चेहऱ्यावरी नेहमीच smile असो
कारण  या चेहऱ्यावर smile आणणारा जोकर
आता नसणार तुझ्या सोबतीला ......!
आता  नसणार तुझ्या सोबतीला ...........!!!

No comments: