स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Thursday, 11 April 2013

मी हसतो स्वतःला.....

मी नाही बघत कुणाला
मी नाही हसत कुणाला
पण जग हसत मला
मी हसतो स्वतःला...!!!!

मी नाही दुखवत कुणाला
शिकलोय सारं दुःख पचवायला
नकली आनंद चेहऱ्यावर दाखवायला
म्हणून “जोकर” म्हणे मी स्वतःला
जग हसत मला... मी हसतो स्वतःला
...
मी नाही घाबरत कुणाला
आज भटकलोय
चुकला किनारा
पण बोट नाही वळवणार मी
सागराला म्हणेल वळव तुझ्या प्रवाहाला
या मुळे ते “वेडा” म्हणतात ते मला
हसतात मला
मी हसतो स्वतःला

वारा तो रिकाम टेकडा... भटका
उगाच फिरतो माझ्या मागे
मी हटकल त्याला कित्तेक दा
तरी उभाच आडवा
मी त्याला भांडतो जरा रुसून
लोक म्हणतात कुणाशी बोलतो हा इतका हसून
त्या मुळे ते हसतात मला
मी हसतो स्वतःला.....

प्रेम आपुलकी माया
बंधुभाव ,देशप्रेम विसरलाय भारत सारा
बोलतो मोठ्याने मी
जरी फटका असला वेश माझा लोक म्हणतातच ..बावळट वेडा
हसतात ते मला
मी हसतो स्वतःला.....

No comments: